Club Meeting Details

Meeting Details

Meeting Date 10 Sep 2023
Meeting Time 08:30:00
Location Cummins College
Meeting Type Regular
Meeting Topic Green Society
Meeting Agenda Implementation of Green activities in societies in cost effective ways
Chief Guest DG Rtn Manjoo Phadke
Joint Meeting With
Club Members Present 4
Minutes of Meeting रोटरी क्लबतर्फे 'ग्रीन सोसायटी' प्रकल्पाच्या कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद रोटरी इंटरनॅशनलच्या वतीने पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनासाठी प्रकल्प राबवण्यास कायमच प्रथम प्राधान्य दिले आहे. या अनुषंगाने रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ तर्फे ग्रीन सोसायटी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पांतर्गत गृहनिर्माण संस्थांमध्ये पर्यावरणपूरक जीवनशैलीविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या 'ग्रीन सोसायटी' प्रकल्पाच्या कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कमिन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे पार पडलेल्या या कार्यशाळेच्या व्यासपीठावर रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१च्या प्रांतपाल रो. मंजू फडके, ग्रीन सोसायटी प्रकल्पाचे संचालक रो. केशव ताम्हनकर व सह-संचालक रो. संतोष जोशी, पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण संस्था आणि अपार्टमेंट महासंघाचे अध्यक्ष श्री. सुहास पटवर्धन, श्रॉफ ग्रुपचे आणि आयजीबीसी पुणे चॅप्टरचे चेअरमन श्री. जे. पी. श्रॉफ आदी मान्यवर उपस्थित होते. प्रथेप्रमाणे राष्‍ट्रगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. पारंपरिक पद्‍धतीने दीप प्रज्‍ज्वलन करून कार्यक्रमाचे उद्‌घाटन करण्याऐवजी यावेळी कुंडीतल्या रोपाला मान्यवरांच्या हस्ते झारीने पाणी घालून कार्यक्रमाचे उद्‌घाटन करण्यात आले. यानंतर प्रकल्पाचे संचालक रो. केशव ताम्हनकर यांनी आपल्या प्रास्तविकात ग्रीन सोसायटी प्रकल्पाबद्दल माहिती दिली. प्रकल्पाचा उद्देश, प्रकल्पाची कार्यपद्‍धती, प्रकल्पाचे भागीदार आणि प्रायोजक यांच्याबद्दल माहेती देताना रो. केशव म्हणाले, रोटरीने २०२० सालापासून पर्यावरणविषयक काम करण्यास सुरुवात केली आहे. ग्रीन सोसायटी म्हणजे केवळ ग्रीन बिल्डिंग उभारणे नसून पर्यावरणपूरक जीवनशैलीचा स्वीकार करत वाटचाल करणे महत्वाचे आहे. आगामी ८ महिन्यात सोसायटीमध्ये होणाऱ्या पर्यावरणपूरक कामांना पुरस्कार देण्यात येणार आहेत. त्यामध्ये रोटरीच्या झोननुसार निवड केली जाणार असून या सर्व प्रकल्पात सोसायटी मधील रहिवाशांना पर्यावरण क्षेत्रातील तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१च्या प्रांतपाल रो. मंजू फडके आपल्या मनोगतात म्हणाल्या, ‘‘शहरी लोकांना रोटरी म्हणजे केवळ खाणे पिणे यात वेळ घालवणारा क्लब असे वाटत असते. परंतु रोटरीने ग्रामीण भागात किती कार्य केले आहे ते माहीत नसते. रोटरीचे काम ग्रामीण भागात जास्त आहे, मात्र आता शहरी भागात पर्यावरणविषयक कार्य करण्याची गरज निर्माण झाली आहे. पुण्यात आम्ही दररोज दहा लाख लीटर पाणी वाचवण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. तसेच आता ग्रीन सोसायटी प्रकल्पाच्या माध्यमातून पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पनवेल या शहरांमध्ये कार्य करण्यात येणार आहे.’’ यानंतर पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण संस्था आणि अपार्टमेंट महासंघाचे अध्यक्ष श्री. सुहास पटवर्धन आपल्या मनोगतात म्हणाले की रोटरीच्या ग्रीन सोसायटी प्रकल्पात शहारातील अधिकाधिक सोसायट्या आणि अपार्टमेंट सहभागी होतील अशी मला खात्री वाटते. रोटरीचा हा उपक्रम अत्यंत महत्वपूर्ण असून यामध्ये आपण सक्रिय सहभागी होऊ असे सांगत जे. पी. श्रॉफ यांनी ग्रीन सोसायटी प्रकल्पाचे कौतुक केले. नंतर मान्यवरांच्या हस्ते 'ग्रीन सोसायटी' प्रकल्पाच्या मासिक वार्तापत्राचे प्रकाशन करण्यात आले. इकॉलॉजिकल सोसायटीचे श्री. अजय फाटक, IGBC च्या डॉ. पूर्वा केसकर आणि प्लंबींग असोसिएशनचे श्री. राहुल धडफळे यांच्या टीमने यावेळी उपस्थितांना कचरा व्यवस्थापन, सौरऊर्जा, ग्रीन कव्हर, रेन वॉटर हार्वेस्टिंग याविषयी मार्गदर्शन केले. तर डॉ. पूर्वा केसकर यांनी स्पर्धे बद्दलची संपूर्ण माहिती दिली. याप्रसंगी ग्रीन सोसायटी प्रकल्पात सहभागी झालेल्या रोटरी क्लब्जचे प्रेसीडेंट्‌स गिरीश ब्रह्मे, गिरीश मठकर, मनीषा पुराणिक, प्रतिभा जगदाळे, सारंग बालांखे, मनोज आगरवाल, निनाद जोग यांना सन्मानित करण्यात आले. तसेच यावेळी ग्रीन सोसायटी प्रकल्पाला सहकार्य करणाऱ्या विविध संस्थाच्या प्रतिनिधींचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रो. प्रतिभा जगदाळे, रो. सारंग बालांखे आणि ॲन जयश्री धुपकर यांनी केले, तर रो. गिरीश मठकर यांनी आभार मानले. या मेळाव्यात ७० गृहनिर्माण संस्था व १४ ग्रीन सप्लायर्सनी भाग घेतला आणि सर्वं मिळून १५० लोकांची उपस्थिती होती. या प्रोजेक्ट साठी विलास जावडेकर डेव्हलपर्स, मायक्रोस्कॅन आणि जेपी एंटरप्रायजेस यांचे प्रायोजकत्व लाभले आहे. IGBC, इकोलॉजिकल सोसायटी आणि पुणे जिल्हा सहकारी गृह निर्माण संस्था आणि अपार्टमेंट महासंघ हे सहयोगी आहेत.


Meeting Date 10 Sep 2023
Meeting Time 09:30:00
Location College of Engineering Pune
Meeting Type Meeting With DRT
Meeting Topic District Interact Assembly
Meeting Agenda Motivational speech and cultural activities for Interacts
Chief Guest Makarand Tilloo
Joint Meeting With
Club Members Present 4
Minutes of Meeting Interact assembly with District team - Motivational speech, Cultural activities like songs, Plays etc.